ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांनी स्वतः याबाबत ट्विट करत माहीती दिली आहे. सद्य स्थितीत ते आयसोलेटमध्ये आहेत.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, आज मी माझी कोरोनाची टेस्ट केली असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आता माझी तब्येत स्थिर असून माझ्यामध्ये कोणतेही लक्षणे नाही आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी घरामध्ये क्वारंटाइन झालो आहे.
यासोबतच ते म्हणाले की, माझे सर्वांना आवाहन आहे की, मागील काही दिवसात जे कोणी माझ्या संपर्कात आले होते त्यांनी स्वतःची कोरोना टेस्ट करून घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.









