ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेशातील कानपूर येथे पोलीस आणि गुंडांमध्ये झालेल्या चकमकीत उपअधीक्षकासह 8 पोलीस शहीद झाले आहेत.
कानपूरच्या बिकरू गावात गुंड विकास दुबे याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गुंडांनी अंदाधुंद गोळीबार केला. या वेळी झालेल्या चकमकीत एक पोलीस उपअधीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल शहीद झाले आहेत. घटनास्थळी पोलिसांची दुसरी टीम दाखल झाली असून, फॉरेन्सिक टीमनेही तपासकार्य सुरू केले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश डिजीपी एच सी अवस्थी यांना दिले आहेत.









