अजितदादांचा अल्टिमेटम एसटी कर्मचाऱ्यांनी धुडकावला
कोल्हापूर/प्रतिनिधी
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. आंदोलनादरम्यान अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची आणि बडतर्फीची कारवाई करण्यात आलीय. कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी ३१ मार्चपर्यंत कामावर परतण्याचे आवाहन केले होते. ३१ मार्चची मुदत संपत आली असून आता १ एप्रिलपासून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांना शेवटचा दिवस कामावर परतण्यासाठी आहे. जे कर्मचारी येणार नाहीत त्यांच्या जागी कंत्राटीपद्धतीने नवीन कर्मचाऱ्यांना घेण्यात येईल असे अजित पवार म्हणाले आहेत. तसेच निर्बंधमुक्तीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतील अशी माहिती अजित पवार यांनी दिलीय. यावर आता एसटी कर्मचाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून अजित पवारांनी दिलेला अल्टिमेट धुडकावत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांची ३१ मार्चची मुदत संपत आली असून कामावर हजर नझाल्यास १ एप्रिलपासून कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा दिला असून यावर एसटी कर्मचाऱ्यांनी संतप्त प्रितिक्रिया व्यक्त केल्या आहेत. न्यायालयाने पाच तारखेपर्यंत वेळ दिली असताना कामावरून काढून टाकण्याची धमकी कशासाठी असा थेट सवाल एसटी कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना केले आहे. तसेच पुढच्या काही दिवसात अजितदादा ही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जोडीला जेल मध्ये असतील असं गंभीर वक्तव्यही त्यांनी केलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आमचा सम्प सुरु आहे. याकाळात एकही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आम्हाला कोणतीही मदत केलेली नाही. तर उलट या संप काळात भाजपने आम्हा कर्मचाऱ्यांना तारले असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
तसेच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक लागली असून महाविकास आघाडीकडून काँग्रेच्या जयश्री जाधव निवडणूक लढवत आहेत. तर भाजप कडून सत्यजित कदम हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणूकित सर्च कर्मचारी महाविकास आघाडीच्या विरोधात उतरणार रस्त्यावर असून त्यांच्या विरोधात प्रचार करणार तसेच महाविकास आघाडीला कोणताही कर्मचारी मतदान करणार नाही असे कर्मचाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.