नवी दिल्ली
मोदी सरकारने 2016 मध्ये देशभरातील शहरांना हवाई वाहतूकीने जोडण्यासाठी उडान योजना सुरु केली होती. चार वर्षानंतर या योजनेला पूर्णपणे यश आलेले नसल्याचे बोलले जात आहे. हवाई विमान कंपन्यांनी निर्धारित केलेल्या विविध शहरांच्या विमान फेऱयांच्या तुलनेमध्ये 40 टक्के इतकीच हवाई सेवा सुरू आहे. विमानतळासाठी आवश्यक क्षमता आणि मागणीतील घट विमान कंपन्यांना सध्याला सतावते आहे. 766 मार्गांवर विमाने सुरू करायची होती पण प्रत्यक्षात मात्र सध्याला 311 मार्गांवर उडानअंतर्गत सेवा 47 विमानतळांवरून दिली जात आहे.









