प्रतिनिधी / सातारा
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग खड्याचा महामार्ग आहे. याच महामार्गालगत वाई तालुक्यातील उडतारेनजीक सेवा रस्ता गेल्या दीड महिन्यापासून खचत चालला आहे. कुडाळी नदीवर असलेल्या या पुलाचा भराव खचून गेल्याचे वृत्त एक महिन्यांपूर्वी तरुण भारतने प्रसिद्ध केले होते.
या पुलाजवळील भराव भरून घेण्याचे आणि डागडुजी केली नाही. त्यामुळे आता पूर्ण सेवा रस्ता नदीच्या बाजूने आरला आहे. दुर्लक्ष केल्यास महामार्गाला पुणे बाजूच्या लेनला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याची दुरुस्ती करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे शशिकांत जाधव यांनी केली आहे.









