वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाच्या विळख्यात विविध जीवपयोगी वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी देश विविध टप्प्यांवर काम करत आहे. यामध्ये सध्या अन्न धान्य व गॅसची चिंता अनेकांना लागून राहिल्याचे चित्र एका बाजूला असताना. आता उज्ज्वला एलपीजी सिलेंडरचा तुडवडा भासरणार नसल्याचे केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱया लोकांसाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे उज्ज्वलाचे तीन सिलेंडर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
कोरोनाच्या संकट काळात कोणत्याही स्थितीत उज्ज्वला गॅसचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे पेट्रोलियम आणि नैसिर्गिक गॅस मंत्रालयाच्या एका अधिकाऱयांने सांगितले आहे. यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी दुसऱयांदा यूएइच्या राज्यमंत्री आणि अबुधाबी नॅशनल ऑईल कंपनीचे सीईओ सुल्तान अल जबेर यांच्यासोबत व्हिडिओ परिषेदतून चर्चा केली असल्याचेही सांगितले आहे.









