वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरामध्ये उज्ज्वला 2.0 आणि पंतप्रधान उज्ज्वला योजना (पीएमयुवाइ) यांच्या अंतर्गत 8.8 कोटी एलपीजी कनेक्शन्स दिली गेली असल्याची माहिती राज्यसभेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना या संदर्भात पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली आहे.

30 नोव्हेंबर 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार तेल विपणन कंपन्यांनी देशभरामध्ये उज्ज्वला 2.0 आणि पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत 8.8 एलपीजी जोडणी करण्यात आली आहे. देशामध्ये गरीब परिवारातील वयस्कर महिला सदस्यांच्या नावावर आठ कोटी घरगुती गॅसची जोडणी देण्यात आल्याची माहिती आहे. एक मे 2016 रोजी या योजनेचा प्रारंभ झाला आहे. यासह 10 ऑगस्ट रोजी उज्ज्वला 2.0 योजनेस प्रारंभ केला असून यामध्ये जवळपास 1 कोटी एलपीजी कनेक्शन्स दिल्याचे नमूद केले आहे.









