राजेंद्र पोळ यांचे नाटक सादर
सांगली : प्रतिनिधी
मध्य प्रदेश सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने उज्जैन येथे नुकत्याच झालेल्या विक्रम महोत्सवात महान राजा विक्रमादित्य या नाटकाने उज्जैन वासियांची मने जिंकली.
राजा विक्रमादित्य यांच्या चरित्रावर आधारित महाराष्ट्रातील लोककलेच्या स्वरूपात सादर झालेले हे नाटक राजेंद्र पोळ यांनी लिहिले असून याचे दिग्दर्शन प्रशांत जगताप व आस्था गोडबोले यांनी केले. संगीत व गायनाची जबाबदारी शाहीर बजरंग आंबी व सहकारी यांनी सांभाळली. प्रकाश योजना आनंद कुंभार यांनी केली होती. या नाटकास गौतम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले होते.
देशातील बंगाल, गुजरात, उडपी, मणिपूर इत्यादी प्रांतातील कलाकारांसमवेत महाराष्ट्रातील नाट्य पंढरी सांगलीच्या कलाकारांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.
या नाटकात आकाश कदम , मनिषा काळे, अश्विनी जाधव, हरीप्रिया कुलकर्णी, प्रसाद भोसले, सुमीत वाठारे, रोहण पाटील, शेखर देशपांडे, सचिन वाघमारे, रमेश पाटील, सुहास पाटील, ऋषिकेश चौधरी, श्रुती माळी, संतोष भोसले आणि किशोर चव्हाण यांनी विविध भूमिका साकारल्या.