करमाळा / प्रतिनिधी
उजनी जलाशयावरील पोमलवाडी ता.करमाळा पुलाजवळील भराव्यावरून वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला. आज सकाळी जलाशयाजवळीत जॅकवेलजवळ मृतदेह आढळला. मिलिंद भारत भिसे हा 35 वर्षीय तरुण बुधवारी झालेल्या मुसळधार पावसात उजनीच्या पाण्यात वाहून गेला होता.
याबाबत माहिती अशी की, बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी जलाशयाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. जलाशयाच्या फुगवट्यावर मिलिंद भिसे हा काम करत होता. पुलाच्या भराव्यावर पाणी येत असल्याचे दिसून येताच भराव्यावरील जनरेटर बाजूला काढण्यासाठी तो वाहत्या पाण्यात उतरला. जनरेटर बाजूला करण्याचा प्रयत्न करत असता अचानक पाण्याचा मोठा प्रवाह आला. यामध्ये भरावा फुटून पाण्याच्या प्रवाहाबरोबर मिलिंद वाहत गेला. तेव्हापासून तो बेपत्ता होता.
परिसरातील मच्छीमारांनी व पोलिसांनी दोन दिवस त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश आले नाही. मात्र आज सकाळी जलाशयाजवळील जॅकवेलजवळ त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. याबाबत केतुरचे पोलीस पाटील गणपत पाटील यांनी त्या ठिकाणी समक्ष जाऊन पाहणी केली. तसेच मृतदेह पोस्टमार्टमसाठी करमाळयाकडे पाठविण्यात आला. विशेष म्हणजे या पुलाचे काम तीन दिवसात संपणार होते. तर मयत मिलिंद भिसे यांनी १० ऑक्टोंबर रोजी आपला ३५ वा वाढदिवस याच ठिकाणी भराव्यावर साजरा केला होता. त्यानंतर चारच दिवसांनी काळाने त्यांच्यावर घाला घातला.
दरम्यान, पुलाचा भरावा वाहून गेल्याने या ठिकाणची वाहतूक व संपर्क तुटला आहे. ठेकेदाराने पर्यायी मार्ग त्वरित उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









