बेंबळे / वार्ताहर
पावसाचे दुसरे सत्र सप्टेंबरच्या दूस-या आठवड्यात सुरु होणार असल्याचे हवामान विभागाने जाहिर केले. त्यानंतर लगेचच येत्या ३६ तासात महाराष्ट्रात मोठ्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आणि म्हणूनच की काय गेल्या दोन दिवसापासून सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जोरदार वारे सुटत आहे. त्यामुळे एरवी शांत असणारा उजनी पाणलोट परिसरातील जलाशययावरील वांगी ,पारेवाडी,पोमलवाडी माढा तालुक्यातील अकोले,(खु,),फुटजवळगाव,उजनी,सुर्ली तसेच पुणे जिल्ह्यातील ,अ.नगर जिल्ह्यातील इतर अनेक उजनी काठावर असलेल्या गावादरम्यान असणाऱ्या बॅकवॉटर परीसरात जलाशयात मोठ्या लाटा पहावयास मिळत आहेत. समुद्रात उसळणार्या लाटाचा अनुभव उजनी काठावरील नागरिकांनी अनुभवला. समुद्र किनाऱ्यावर गेल्यासारखे फोटो, सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.
सध्या उजनी धरण पूर्ण क्षमतेने तुडुंब भरले आहे. धरणाचा पाणीसाठा १०९ टक्केवर झाल्याने या लाटा प्रत्यक्ष जाणवत होत्या. एरवी शांत असणाऱ्या लाटा जोराच्या वा-यामुळे पाण्याचा किनाऱ्यावरील धडकत असल्याने आवाजसुध्दा बदलून मोठा झाला होता. पुलावरुन येणा-जाणारे नागरिक मुद्दाम थांबून या बदलाचा आनंद घेत होते. जोरदार वाऱ्यामुळे लाटा वाढल्याने मच्छीमारांनी आपल्या होड्या जलाशयात न सोडता नदीकिनारी ठेवण्याला पसंती दिली आहे. हवामान विभागाने येत्या ३६ तासात महाराष्ट्रात मोठ्या पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने १२२ टीएमसी पाणी साठा असणाऱ्या या उजनी धरणात अजून दोन दिवस तरी या लाटा राहतील असा अंदाज आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









