वार्ताहर / बेंबळे
उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चालू पावसाळी हंगामाच्या सुरूवातीच्या चार दिवसात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या धरणसाखळी क्षेत्रात 627 मि. मी. तर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 29 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सद्यस्थितीला उजनी धरणाची टक्केवारी तब्बल उणे 22 टक्क्मयांपर्यंत गेली आहे. सध्या उजनी धरणाची पाणीपातळी 489.200 मी, एकूण पाणीसाठा 1471 दलघमी तर मृतसाठा उणे 331.81 दलघमी एवढा नोंदविण्यात आला आहे. मृतसाठा असणाऱया 64 टीएमसी पाण्यापैकी तब्बल 12 टीएमसी पाणी वापरात आले आहे. यातील केवळ 52 टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यात गाळाचे प्रमाण 25 टीएमसी असून केवळ पाणी म्हणून 25 ते 27 टीएमसी पाणी उजनीत शिल्लक आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसात 627 मिमी पावसाची नोंद झाली असून, यामुळे उजनी धरणात यंदा लवकरच पाणीसाठा होण्याची आशा निर्माण झाली आहे. या पावसामुळे हवेतील उष्णता कमी होऊन आद्रता वाढल्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण 7.50 मिमीवरून ते 6.50 मिमीवर खाली आले आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने सुरुवात केली असून उजनी धरणाच्या वरील बाजूस असणाऱया 18 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत खालिलाप्रमाणे पावसाची नोंद झाली आहे.
धरण पर्जन्यवृष्टी मी.मी.
पिंपळगावजोगे 39
माणिकडोह 31
येडगाव 08
वडज 06
डिंभे 30
घोड. 10
विसापूर 06
कळमोडी 13
चासकामान 64
भामाआसखेड 18
वडिवळे 24
आंध्र 141
पवना 12
कासारसाई 67
मुळशी 02
टेमघर 35
वरसगाव 51
पानशेत 50
उजनी 29