प्रतिनिधी / कोल्हापूर
उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय आपल्या विभागात या उपक्रमाला शिवाजी विद्यापीठ राजमाता जिजाऊ बहुउद्देशिय सभागृहात सुरुवात झाली. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी , पालक , शिक्षक , प्राचार्य, शैक्षणिक संस्थांची ३६३५ प्रकरणे प्रलंबित होती. त्यापैकी २७६४ प्रकरण निकालात काढण्यात आलेली आहेत. तसेच अनुकंपा खालील १७ पैकी १० जणांना याच उपक्रमात नियुक्ती पत्र देण्यात आली, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले .
|
मंत्री सामंत म्हणाले, सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी चंदगड येथील शिनोळी येथे शैक्षणिक संकुल सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकार्यांनी १० एकर जागा देण्याचे मान्य केले आहे . या ठिकाणी व्यवसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची तीन केंद्र सुरू केली जाणार आहेत. शिवाजी विद्यापीठातील बाळासाहेब देसाई अध्यासन केंद्रासाठी येत्या पंधरा दिवसांमध्ये एक कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने अध्यासन सुरू केले जाणार आहे. यासंदर्भात सर्व विद्यापीठातील कुलगुरू, कुलसचिव यांना सूचना देण्यात आल्या आहेत, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
सुरूवातीला उच्चशिक्षण विभागाचे पुणे विभागीय संचालक डॉ. धनराज माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार ऋतुराज पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सोशल डिस्टंग्सिंगचा फज्जा
मंत्री सामंत स्टेजवर आल्यानंतर निवेदन देणार्या संघटनांनी स्टेजवर गर्दी केल्याने सोशल डिस्टंग्सिंगचा फज्जा उडाला. सभागृहात ही प्रचंड गर्दी होती. दिवसभर स्टेजवर आपआपले प्रश्न मांडण्यासाठी तक्रारदारांनी गर्दी केली होती.
अधिकार्यांची दमछाक
तक्रारदारांनी मंत्री सामंत यांच्याकडे तक्रार मांडल्या नंतर मुंबई मंत्रालयासह स्थानिक अधिकार्यांची कागदपत्रे शोधताना दमछाक झाली.
दिव्यांग कर्मचाऱ्यांचे निवेदन मंत्र्यांनी स्टेवरुन खाली येवून स्विकारले
शिवराज महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रशासकीय कर्मचारी दिव्यांग प्रभावती सावंत, बी. डी. रेगडे, बी. डी. सावंत, डी. एम. तेरळे यांचा वेतन निश्चितीचा प्रश्न त्वरित सोडवण्याचे आदेश दिले. तक्रारदार दिव्यांग असल्याने मंत्री सामंत यांनी स्टेजवरून खाली येवून संबंधीतांचे म्हणने एकूण घेतले. मंत्र्यांच्या या मोठेपणाची सभागृहात चांगली चर्चा होती.









