अचूक बातमी “तरुण भारत” ची, सोमवार, 26 एप्रिल, दुपारी 11.58
● रविवारी रात्री अहवालात 1,437 बाधित ● कोरोना बळींचे सत्र थांबण्याची आशा ● पॉझिटिव्हिटी रेट 31.32● नेमके कोणत्या तालुक्यात किती ? ● सविस्तर अहवाल काही वेळातच
सातारा / प्रतिनिधी :
शुक्रवारी उच्चांकी 2,001 बाधित वाढी नंतर शनिवारच्या अहवालात 1,933 बाधित वाढ समोर आल्याने आणि मृत्यू सत्र ही थांबत नसल्याने जिल्ह्यातील वातावरण खूपच चिंताजनक झालेले आहे. मात्र रविवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालात बाधित वाढीचा आकडा चांगलाच खाली आल्याचा दिलासा लाभलेला आहे. प्रशासनाकडून सहकारी देण्यात आलेल्या माहितीनुसार 1,437 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. दरम्यान जिल्ह्यात दररोज दोन अंकी आकड्याने सुरू असलेले मृत्यूसत्र ही थांबावे अशी प्रार्थना सर्वजण करत आहेत.
बाधित वाढीचा वेग कमी झाल्याचा दिलासा
एप्रिल महिन्यात कोरोनाने कहर केला असून संपूर्ण जिल्ह्यातील स्थिती अवघड झालेली आहे. शुक्रवारी रात्रीच्या अहवालात 2001 जणांचा अहवाल बाधित आल्याचा नवीन उच्चांकी आकडा समोर आला आणि सर्वांच्या काळजात धस्स झाले आहे. आता शनिवारी काय ?असा प्रश्न मनात घेऊन झोपलेल्या जिल्हावासीयांना रविवारी सकाळी आलेल्या 1,933 जणांच्या बाधित अहवालाने धक्काच दिलेला आहे. मात्र रविवारी पहाटे 5 वाजता ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध केलेल्या अचूक बातमी च्या माध्यमातून सोमवारी मंगळवारी उच्चांकी कोरोनामुक्ती होईल व बाधित वाढीचा वेग कमी येईल असा अंदाज व्यक्त केलेला होता.
रविवारी अहवालात 1,437 बाधित
मागील दोन-तीन दिवसातील उच्चांकी आकडेवारी नंतर रविवारी सकाळी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या अहवालात 1,437 जणांचा अहवाल बाधित आला आहे. हा मंदावलेला वेग दिलासादायक आहे. या अहवालानुसार एकूण 4 हजार 620 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1,437 जणांचा अहवाल बाधित आलेला असून पॉझिटिव्हिटी रेट 31.10 असा आहे.
बाधित वाढ रोखण्याचे आव्हान
जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने सुरू असलेली बाधित वाढ चिंताजनक ठरू लागली आहे. मात्र शुक्रवारच्या उच्चांकी 2,001 आकड्या नंतर शनिवारी 1,933 रविवारी 1,437 अशी बाधित वाढ समोर आली. त्यातच एकाच दिवशी तब्बल 41 बाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्हा हादरला होता. त्यानंतर देखील मृत्यूचे सत्र सुरूच आहे. फक्त त्यात नवीन उच्चांक झालेले नाहीत याचा दिलासा घेत वाटचाल सुरू आहे.
बेड, ऑक्सिजनसाठी पळापळ सुरुच
जिल्ह्यात एकूण उपचार घेणाऱ्यांची संख्या सोळा हजारांच्या पार गेले असून त्यापैकी प्रत्यक्ष दवाखान्यात 3 हजारांच्या वर रुग्ण उपचार घेत आहेत मात्र दुसरीकडे उच्चांकी बाधीत वाढ होत असल्याने आता जिल्ह्यात बेड मिळणे दुरापास्त झाले आहे. बेड आणि ऑक्सिजन साठी बाधित आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची जीवघेणी धावपळ जिल्ह्यात सुरू आहे. प्रशासनाकडून सूचनांचा भडिमार सुरू आहे मात्र आरोग्य सुविधा देण्यात प्रशासन आता अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे लोकांनीच स्वतःची काळजी घेऊन हा लढा जिंकण्यासाठी सिद्ध व्हायला हवे असा संदेश परिस्थिती देऊ लागली.
रविवारी रात्री 1,437 बाधित
जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आज तरी मृत्यूदरात वाढ होऊ नये अशी प्रार्थना सर्वजण करत आहेत. मात्र त्याची सविस्तर माहिती काही वेळात मिळेल.
रविवारपर्यंत जिल्हय़ात एकूण बाधित 93,619, एकूण कोरोनामुक्त 73,588, एकूण बळी 2,329 एकूण उपचारार्थ 17,710
रविवारी जिल्हय़ात बाधित 1933, कोरोनामुक्त 2000, बळी 39









