वार्ताहर / उचगाव
उचगाव येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांना निवेदन देऊन उचगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हायमास्ट लाईट मंजूर करून निधी द्यावा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन दिले.
उचगावच्या प्रवेशद्वारानजीक उचगाव ग्रामस्थ तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे देणगी जमा करून 21 फुटी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला आहे. या चौकात हायमास्ट लाईटची गरज असल्याने यासाठी ग्रामस्थांनी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची भेट घेऊन या हायमास्टची मागणी केली. जारकीहोळी यांनी चौकाची पाहणी करून मोठा हायमास्ट लाईटची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.









