चोरट्यांच्या मारहाणीत दोघे जखमी
उचगांव / वार्ताहर
तावडे हॉटेल परिसरातील दुकान बंद करून मोटरसायकलवरून दोघे व्यापारी बंधू घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी त्यांना बुक्क्यांनी मारहाण करत कॉलर पकडून दीड लाख रुपयांची रक्कम असलेली बॅग हिसकावून घेऊन लंपास केली. दरम्यान, चोरट्यांच्या मारहाणीत ज्ञानराज नारायण नाडर व त्यांचे बंधू आंबुराज नारायण नाडर ( दोघेही रा. निगडे बिल्डिंग, उचगाव, ता करवीर, मूळ रा. मलीएनकुडी, ता नागणेरी, जि. त्रियनवेली, तमिळनाडू) दोघे जखमी झाले. शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास पुणे-बेंगलोर महामार्गावर उचगाव रेल्वे पुलावर ही घटना घडली.
शुक्रवारी रात्री तावडे हॉटेल परिसरात असलेले मन्ना ट्रेडर्स नावाचे गोळ्या-बिस्किट व फरसाणचे घाऊक दुकान बंद करून नाडर बंधू घरी मोटरसायकलवरून चालले होते. ते उचगाव रेल्वे पुलाच्या उतारास आले असताना पाच अज्ञात चोरटे पाठीमागून ॲक्टिवा व स्प्लेंडरवरून आले. त्यांनी नाडर बंधूंची कॉलर पकडून बुक्क्यांनी मारहाण केली. त्यात ज्ञानराज व आंबूराज नाडर जखमी झाले. नाडर यांच्या हातातील दीड लाख रकमेची कॅश बॅग चोरट्यांनी हिसकावून घेऊन पोबारा केला. नाडर बंधूना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चोरी झाल्याचे समजताच शुक्रवारी रात्री पोलीस घटनास्थळी गेले. अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ प्रशांत अमृतकर यांनी घटनास्थळी भेट दिली. गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांना त्यांनी तपासाच्या सूचना दिल्या. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, शिरोली औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनीही घटनास्थळी भेट दिली व तपास सुरू केला.
याबाबतची फिर्याद ज्ञानराज नाडर यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. शनिवारी पहाटे पावणे पाचच्या दरम्यान अज्ञात 5 चोरट्यांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









