काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल
प्रतिनिधी \ बेळगाव
स्वयंपाक करताना अंगावरील कपडय़ांनी पेट घेतल्याने भाजून गंभीर जखमी झालेल्या उचगाव (ता. बेळगाव) येथील एका महिलेचा बुधवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
सुनिता गणपत तरळे (वय 27, रा. बसुर्ते क्रॉस, उचगाव) असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. 2 डिसेंबर 2019 रोजी सकाळी स्वयंपाक करताना अंगावरील कपडय़ांनी पेट घेवून ती भाजून गंभीर जखमी झाली होती. तिला सुरुवातीला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
दोन दिवसांपूर्वी तीला सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले होते. बुधवारी दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी पुढील तपास करीत आहेत.









