वार्ताहर/ उचगाव
उचगाव ग्राम पंचायतमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी 21 उमेदवारांसाठी 83 जणांनी अर्ज भरले असून वॉर्ड क्र. 5 मधून एससी ग्रुपमध्ये एकमेव अर्ज अनुसया कोलकार यांचा रहिल्याने त्या बिनविरोध म्हणून निवडून येणार असल्याचे समजते.
उचगाव ग्रा. पं. च्या निवडणुकीसाठी उचगाव ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील उचगाव, बसुर्ते व कोनेवाडी या तीन गावांसाठी 8 वॉर्डामधून 83 उमेदवारांनी 21 जागांसाठी अर्जभरले आहेत. यावेळी या निवडणुकीसाठी उमेदवारांनी भाऊगर्दी केल्याचे पाहावयास मिळाले.
उमेदवारी भरणाऱयांमध्ये युवकांच सहभाग अधिक असल्याचे दिसते. शनिवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस असून शनिवार दि. 12 रोजी निश्चित उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.









