बेळगाव / प्रतिनिधी
शहरातील विकासकामे स्मार्टसिटी योजने अंतर्गत राबविण्यात आली आहेत . पण तीच स्मार्टसिटीची कामे धोकादायक ठरू लागल्याचे पहायस मिळत होते . गेल्या दोन महिन्यांपूर्वी धर्मवीर छत्रपती संभाजी चौक येथील म?नहोल मध्ये वाहनाचे चालक जाऊन नुकसान झाले होते. त्यामुळे रस्त्यावरील मनहोल पादचाऱयांसाठी आणि वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत असल्याचे वृत्त तरुण भारत ने प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन प्रशासनाने म?नहोलच्या बाजूने संरक्षण दिले आहे
येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक ते संचयनी सर्कल जवळील पेट्रोल पंप पर्यंत आठ ते नऊ म?नहोल उघडय़ावरच होती . तर काही ठिकाणी फरशी घालून ते मनहोल झाकण्यात आले होते . पण त्या फरश्या देखील धोकादायक स्थितीत होत्या तसेच पडण्याच्या मार्गावर देखील होत्या . त्यामुळे संभाव्य धोका ओळखून तरुण भारतने याबाबत वारंवार पाठपुरावा केला होता. तसेच या अनेक म?नहोलमध्ये वाहने अडकुन नुकसान देखील झाले होते.
उघडय़ावर असलेल्या मनहोलमुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या पाहायला मिळत होत्या. याबाबत तरुण भारतने आवाज उठवितातच व याबाबत बातमी प्रसिद्ध करतातच प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी लागलीच शहरातील म?नहोलला लोखंडी सळय़ाने संरक्षण देऊन व काही ठिकाणी दगड ठेऊन वाहनधारकांची व पादचाऱयांची समस्या दूर केली आहे. त्यामुळे नागरिकांमधून वाहन चालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.