नुतन जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल यांची प्रथमच मोठी कारवाई
प्रतिनिधी/उंब्रज
उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतील विविध गुन्हातील व दोन टोळ्यांमधील एकुण सात जणांना जिल्हा पोलीस अधिक्षक तथा अजयकुमार कुमार बंसल यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ अन्वये खालील प्रमाणे हद्दपार केल्याचे आदेश जारी केले आहेत. याबाबतची माहिती पोलिस अधिक्षक कार्यालय सातारा यांनी मंगळवारी दिली. उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी हद्दपार प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुखांकडे सादर केला होता. यावर तातडीने कारवाई करत नुतन जिल्हा पोलीस प्रमुखांनी प्रथमच मोठी कारवाई करत सात जणांना तडीपार केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
उंब्रज व पाटण पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी, मोठी दुखापत, दरोडा, गर्दी मारामारी, करणाऱ्या टोळीचा प्रमुख संदीप भानुदास भिंताडे वय २५ रा. जाळगेवाडी, ता.पाटण, तसेच सागर ऊर्फ बंडा शंकर गायकवाड, वय २७ रा.उंब्रज,ता.कराड, सोन्या शाहीद शब्बीर मुल्ला, बय-२२ रा.उंब्रज, ता.कराड, रोशन ऊर्फ रोश्या अरविंद सोनावले वय २१ रा.उंब्रज.ता.कराड,यांची टोळी तयार झाली होती. ते टोळीने गुन्हे करीत होते. तसेच त्यांच्यावर प्रतिबंधक
कारवाई करुनही व यापुर्वी सन २०१९ मध्ये त्यांना सहा महीने सातारा जिल्हा हद्दपार करुन सुध्दा त्यांनी हद्दपार कालावधी संपताच त्यांनी पुन्हा दोन गंभीर गुन्हे करुन समाजात दहशत,भितीचे वातावरण निर्माण केले होते. त्यांचेवर कारवाई करुनही त्यांचे बेकायदेशिर हालचालीस प्रतिबंध झालेला नाही. या टोळीतील चार इसमांना पुर्ण सातारा जिल्हा व सांगली जिल्हयातील कडेगाव, वाळवा व शिराळा
तालुक्यातुन एक वर्षा करीता हरपारीचा आदेश केला आहे. तसेच उंब्रज पोलीस ठाणे हदीत खुनाचा प्रयत्न,खंडणी,विनयभंग,दुखापत मारामारी,जळीत,शिवीगाळ, दमदाटी, करणारे टोळीचा प्रमुख रणजित नधुराम सरगर, वय-२३ (टोळी प्रमुख) रा. वाघेश्वर, ता.कराड,अक्षय ऊर्फ आप्पा अंकुश लोखंडे, वय २४ रा.संजयनगर मसुर, ता.कराड, धिरज रघुनाथ जाधव, वय-३० वर्षे, रा. वाघेश्वर, मसुर, ता.कराड, जि.सातारा यांना सुधारणेची संधी देवुनही व त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्यांचे वर्तणात सुधारणा झाली नाही. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. या टोळीतील तीन इसमांना पुर्ण सातारा जिल्हयातुन सहा महीन्या करीता हद्दपारीचा आदेश केला आहे.
वरील इसमांना हद्दपार करणे बाबत जनतेमधुन मागणी होत होती. त्यांच्याकडुन कराड व पाटण,सातारा, तालुका व सातारा जिल्हात हिंसक घटना घडुन भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होवु नये म्हणुन या टोळीतील प्रस्तावित दोन्ही टोळी मधील सात इसमांना हद्दपार करणे बाबत उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी अजय कुमार बंसल, हद्दपार प्राधिकरण
तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे त्यांचा हद्दपार प्रस्ताव सादर केला होता.त्यावर चौकशी व सुनावणी होवुन दोन्ही बाजुचे म्हणणे
एकुण वरील प्रमाणे आदेश झालेले आहेत.वरील सुनावणी दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पो.निरीक्षक श्री.आनंदसिंग साबळे, व सहाय्यक पो.फौजदार मधुकर गुरव यांनी योग्य ते पुरावे सादर केले.या कारवाईचे सर्व स्थरातुन समाधान व्यक्त होत आहे. जिल्हयात अशाच प्रकारे समाजामध्ये दहशत पसरविणा-या, समाजात बेकायदेशीर कारवाया करणा-या टोळयांचे विरुध्द तडीपारची कारवाई सुरुच रहाणार असल्याचे यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी सांगितले.







