शेतात पडलेल्या अंड्यांची केली उबवणूक
प्रतिनिधी / सरवडे
उंदरवाडी ता. कागल येथील सर्पमित्र बाजीराव कुदळे व शशिकांत चव्हाण यांनी शेतात सापडलेली सरड्याची अंडी मातीत उबवून तब्बल २७ पिलांना जीवन दिले आहे. जन्मलेली सर्व पिल्ली त्यांनी जंगलात सोडून दिली आहेत.
महिन्यापूर्वी एक शेतकरी शेतात नांगरट करीत असताना त्यांना कसलीतरी अंडी दिसली. अंडी सापाची असणार असे समजून त्यांनी तात्काळ सर्पमित्र बाजीराव व शशिकांत यांना बोलावून घेतले. त्यांनी अंड्याचे निरिक्षण केले. त्यामध्ये ती अंडी सापाची नसून सरड्याची असल्याचे लक्षात आले.
त्यांनी ती ३० अंडी आणून मातीच्या ट्रेमध्ये उबवत घातली. योग्य काळजी घेत त्यावर लक्ष ठेवले. ३४ दिवसांनंतर अंड्यातून २७ पिल्लांनी जन्म घेतला. सर्पमित्रांनी त्यांची चांगली देखभाल करून जंगलात सोडून दिली. शेतकर्यांने दाखवलेले प्रसंगावधान व सर्पमित्रांनी घेतलेली दक्षता यामुळे सरड्यांच्या पिल्लांना सुखरुप जन्म मिळाला आहे. त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.
कुदळे व चव्हाण यांनी अनेक वर्षे सरपटणाऱ्या साप, सरडे आदी प्राण्यांवर प्रेम करण्याचा छंद जोपासला आहे. शेकडो सापांना पकडून जीवनदान दिले आहे. त्यामुळे या विभागात ते सर्पमित्र म्हणून परिचित असून कोणाच्याही घरात, आवारात साप आल्यानंतर त्यांना बोलवले जाते. ते साप पकडून जंगलात सोडून देतात. त्यामुळे अनेक सापांना जीवदान मिळाले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









