वार्ताहर /मडकई
तारीवाडा उंडिर ते तिस्क दरम्यान पूल व बगल रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या झुडुपांची श्रमदानाच्या माध्यमातून साफसफाई करण्यात आली. त्यात भजनी कलाकार श्रीपाद वामन नाईक गावणेकर, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, सत्यवान नाईक, प्रेमानंद तारी, तुळशीदास तारी, रमेश पार्सेकर, संतोष नाईक, लक्ष्मण नाईक, खुशाली नाईक, वल्लभ पर्वतकर, कुमार नाईक, पुंडलीक नाईक, आल्बेट डायस, सुनिल नाईक, विशांत नाईक व प्रदीप बखले व अन्य नागरिकांचा सहभाग होता.
तारीवाडा उंडिर ते तिस्कपर्यंतचा रस्ता व पूल उभारून प्रवासी, कामगार व नागरिकांची मंत्री सुदिन ढवळीकर यांनी उत्कृष्ट सोय केली आहे. सायंकाळच्या वेळी ज्येष्ठ नागरिक रस्त्याच्या बाजूला निवांतपणे बसून निसर्गाचा आनंद लुटतात मात्र पावसाळय़ात आजूबाजूला झाडी वाढल्याने गैरसोय व्हायची. त्यासाठी श्रमदान करण्यात आले, असे गायक कलाकार श्रीपाद वामन नाईक गावणेकर यांनी सांगितले.
प्रेमानंद तारी म्हणाले, सायंकाळच्या वेळी जॉगिंगसाठी येणाऱया युवकांनी शिस्त पाळावी. रस्त्याच्या बाजूला असलेल्या गाडेधारकांनी परिसर स्वच्छ ठेवावा. कचरा उघडय़ावर न फेकता तो कुंडीत टाकावा. यावेळी श्रीपाद गावणेकर यांच्या नेतृत्त्वाखाली ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वागत सत्यवान नाईक यांनी केले तर विशांत नाईक यांनी आभार व्यक्त केले.