केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची माहिती : मागील सहा महिन्यातील आकडा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ई-श्रम पोर्टलवर श्रमिकांच्या नोंदणीचा आकडा सहा महिन्यांच्या कालावधीत जवळपास 25 कोटीच्या घरात पोहोचला आहे, अशी माहिती केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली आहे. असंघटीत क्षेत्रामधील जवळपास 38 कोटी कामगारांनी आपली नेंदणी करण्यासाठी ऑगस्ट 2021 रोजी ई-श्रम पोर्टलवर सुरुवात केली होती.
सरकारचे सदरच्या पोर्टलवर असंघटीत क्षेत्रातील श्रमिकांसारख्या उपलब्ध मजूर, रस्त्यांच्या बाजूला असणारे श्रमिक आणि देशातील कामगारांची अधिक प्रमाणात नोंदणी करण्याचे ध्येय राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
‘ई-श्रम पोर्टलवर सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रवास ही आदर्श संकल्पना पूर्ण करण्यासाठी सरकारने ई श्रम पोर्टल ही सेवा सुरु केली असल्याचे केंद्रीय मंत्री यादव यांनी स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सांगितले.
सहा महिन्यांच्या कमी काळातील नोंदणी सदरच्या प्लॅटफॉर्मवर मागील सहा महिन्यांच्या कालावधीत जवळपास 25 कोटीची नोंदणी करण्यात आली असून या कामगिरीतून सरकारची इच्छाशक्ती सादर होत आहे. सरकारच्या उमंग मोबाईल ऍप्लीकेशनवर ई-श्रम पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सेवांमध्ये आणि राष्ट्रीय कॅरिअर सेवा (एनसीएस) पोर्टलवर पोहोचला आहे. याच दरम्यान प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन (पीएम-एसवायएम) पेन्शन योजनेच्या अंतर्गत ‘डोनेट-अ-पेंशन’ची अगोदरच घोषणा केली होती.









