पेटीएम मिनी ऍप्सवर ‘डिजिलॉकर’ची सुविधा
नवी दिल्ली ः ई-वॉलेट पेटीएमचा वापर आपण करत असाल तर आपल्याला सध्याच्या डिजिलॉकरमधील कागदपत्रांना ‘पेटीएम मिनी ऍप्स’वर ऑफलाईन मोडमध्ये ठेवता येणार आहे. जिथे कनेक्टीव्हीटी कमी आहे अशा ठिकाणीही पेटीएम मिनी ऍपच्या माध्यमातून डिजिलॉकरची सुविधा वापरता येणार आहे.
डिजिलॉकर क्लाउडवर एक प्लॅटफॉर्म आहे. जो मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने सुरु केला आहे. यात ग्राहकांना आधार, ड्रायव्हींग लायसन्स, गाडीचे नोंदणी प्रमाणपत्र, इन्शुरन्स, कोविड 19 व्हॅक्सीन प्रमाणपत्रासह डिजिटल फॉर्मेटमध्ये स्टोअर करता येणार आहे.
मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या मदतीने डिजिलॉकरच्या सेवेमार्फत सर्व नागरिकांना पेपर लेस सेवा देण्याचा मानस आहे. यासाठीच नुकताच सरकारने पेटीएमसोबत करार केला असल्याचे सांगितले जाते. त्यामध्ये ग्राहक आपली डाक्यूमेन्टस् सेव्ह करू शकणार आहेत.
डाक्यूमेन्ट स्टोअर करता येत नाही- पेटीएम
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कायदा 2000 च्या आधारे डिजिलॉकरमध्ये स्टोअर (साठवणूक) केलेली कागदपत्रे ही कायदेशीर मूळ कागदपत्रे मानली जातात. पेटीएमने याबाबत खुलासा करताना सदरची कागदपत्रे स्टोअर (साठवणूक) केली जात नसल्याचे म्हटले आहे.
बँकिंग-इन्शुरन्स, हेल्थसाठीची सुविधा
डिजिलॉकरवर टॅप केल्यावर मिनी ऍप सुरु होईल ज्यामध्ये केंद्रीय आणि राज्य सरकारसह शिक्षण, बँकिंग आणि इन्शुरन्स, हेल्थसह इतर डाक्यूमेन्टची एकूण 24 वर्गवारी पाहायला मिळते.









