बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर विकास प्राधिकरणाने (बीडीए) नुकत्याच झालेल्या ई-लिलावाच्या चौथ्या टप्प्यात ३३२ साइटची विक्री करुन२८१ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे.
बीडीएच्या माहितीनुसार लिलावासाठी असलेल्या ४४८ साइटमध्ये, ३३२ साइट्स विकल्या गेल्या आणि इतर साइटवर बोली लावली नव्हती. लिलावात भाग घेण्यासाठी जवळपास १७९० बिडर्सनी प्रत्येकी ४ लाख रुपये भरले होते. त्यापैकी १७२ कोटींची बोली होती.
बनशंकारी, एसएमव्ही लेआउट, जे पी नगर, आर्कावटी लेआउट आणि बीटीएम लेआउटमधील एकूण ४४८ साइटचा बीडीएने लिलाव केला. साइट आणि ई-लिलावाशी संबंधित सर्व तपशील येथून मिळू शकतात.









