कृतवर्म्याने सहाय्य करायचे नाकारल्यावर शतधन्वा धावतच अक्रूराकडे आला व त्याला म्हणाला-अक्रूरा! तू तरी माझा पाठीराखा हो. आज मी संकटात सापडलो आहे. मला कृपा करून आश्रय दे. कृष्णाने मला मारण्याची प्रतिज्ञा केली आहे. आता तूच माझे रक्षण कर. त्यावर अक्रूरानेही कृतवर्म्याप्रमाणेच भूमिका घेतली. तो शतधन्व्याला म्हणाला-शतधन्व्या! ईश्वराच्या बळाला जो जाणतो तो कोणीही कृष्णाशी वैर धरील काय? यांचा प्रताप स्वतः पाहूनही तू यांचा विरोध करतोस, तरी हे वास्तवात कोण आहेत हे जाण. बलराम व कृष्ण यांचे देह भिन्न दिसत असले तरी मुळात ते एकच सनातन ब्रह्म स्वरूप आहेत.
ईश्वरातील ईश्वरी सत्ता यांचेच स्फुरण आहे. जो आपली लीला म्हणून या सृष्टीची निर्मिती, पालन व संहार करतो तोच या पृथ्वीवरील पापाचा भार कमी करण्यासाठी बलराम व कृष्णाचा अवतार घेऊन प्रकट झाला आहे. पण त्याचा हा लीलाविग्रह सहसा विवेकभ्रष्ट, महापापी, दुरात्म्याला कळत नाही.
काय म्हणोनि नुमजे म्हणसी । तरी अजा माया मोहराशि । पडिले तयेचिये ग्रासीं । अभिमानासी वश जाले । मायामोहें जाले भ्रमित । देहतादाम्यें विवेकरहित । नश्वर मानूनियां शाश्वत । ईश्वर समर्थ नोळखती । हातींच्या कंकणा किमर्थ मुकुर । रामकृष्ण हे जगदीश्वर । यांचा प्रताप प्रभाकर । कीं श्रवणगोचर तुज नाहीं ।
अरे! जे माया मोहाने ग्रासले आहेत ते देहतादात्म्यामुळे अहंकार ग्रस्त होतात आणि त्यामुळे समर्थ ईश्वराला ओळखत नाहीत. उलट ते नश्वरालाच शाश्वत समजत असतात. वास्तविक हातच्या कांकणाला आरसा कशाला हवा? बलराम व कृष्ण हे प्रत्यक्ष जगदीश्वर आहेत. त्यांचे अद्भूत प्रताप तू ऐकलेले नाहीस काय?
नरांमाजि श्रे÷ नरेंद्र । त्रिजगीं वरि÷ तो अमरेन्द ।
ज्यातें नमिती सुरासुर । नर किन्नर गंधर्व । तया इंद्राचा अवमान । करूनि वर्जिला त्याचा यज्ञ । गोपांकरवीं गोवर्धन । कृष्णें बोधून पुजविला । तेणें इंद्र चढला क्षोभा । प्रळयमेघीं व्यापिलें नभा । तेव्हां व्रजजन जीवितलोभा। पद्मनाभा बोभाती । ऐकोनि तयांचा आर्तस्वर। सातां वर्षांचा श्रीधर । उपडूनि एक्मया करेंगिरिवर। धरिता जाला तो तेव्हा । जैसें बाळक लीलेंकरून । उच्छिलीन्ध्राचें उत्पाटन ।
करूनि उचली तेंवि कृष्ण । गोवर्धन धरी हस्तें ।
प्रलयमेघ सप्तराती । करकामारुतविद्युत्पातीं ।
इंद्रें पीडितां व्रजाप्रति । नोहे विपत्ति अणुमात्र ।
ऐसा ज्याचा पराक्रम । जाणोनि त्याचा अतिक्रम।
कोण करूं शकेल अधम । केवळ ब्रह्म श्रीकृष्ण ।
ऐसा प्रताप वर्णूनि मुखें । अक्रूर तन्मय जाला सुखें । सकंप माथा तुकोनि हरिखें । नमिता जाला तें ऐका ।
शतधन्व्याला कृष्णाच्या पराक्रमाचे वर्णन सांगताना अक्रूर पुढे म्हणतो – नरांमध्ये श्रे÷ त्याला नरेंद्र असे म्हणतात. तिन्ही जगांत हा अमरेंद्र सर्वात वरि÷ मानला गेला आहे, हे तू जाणतोस.
Ad. देवदत्त परुळेकर








