बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातील भाजपाचे मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याविरोधात राज्यपाल वजुभाई वाला यांच्याकडे त्यांच्या विभागात “हस्तक्षेप” केल्याबद्दल औपचारिक तक्रार केली होती. तक्रारीच्या एका दिवसानंतर, मुख्यमंत्र्यांच्या गटाने हे चुकीचे असल्याचे म्हंटले आहे.
जर ईश्वरप्पा यांना काही आक्षेप असेल तर त्याबाबत प्रथम मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी लागेल. राज्यपालांची भेट घेण्याऐवजी त्यांनी अंतर्गत प्रकरण सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राज्यपालांना तक्रार करणे योग्य नाही, असे गृहमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले.
दरम्यान, भाजप सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री म्हणून येडियुरप्पा यांना पाठिंबा देणाऱ्या भाजपाच्या तब्बल५० आमदारांनी ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरु केली आहे.









