नाशिक \ ऑनलाईन टीम
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही ईडीने समन्स बजावला आहे याबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ईडीचे नाव घेतलं कि लोक घाबरतात, तुमचा छगन भुजबळ करू म्हणून सांगतात. ईडीला त्या लोकांकडून उत्तर दिलं जाईल असे त्यांनी सांगितले. भुजबळ आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, जलबिन मछली तसे सत्तेशिवाय भाजप राहू शकत नाही. कोणत्याही प्रकारे सत्ता मिळवायची याकरीता कुणावर तरी आरोप, कुणाला तरी नोटीस असं संगळ चाललयं. सत्ता मिळविण्यासाठी ईडीचा दुरूपयोग केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ईडीच्या नावाने लोक घाबरतात. ईडीच्या नावाने तुमचा भुजबळ करू असे सांगितले जाते.
नाशिक शहराचा स्मार्ट सिटीमुळे बोजवारा उडाला असल्याची चर्चा सुरू आहे. याबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले, त्या विषयात अजून लक्ष घातलेलं नाही. मात्र, एकदा पाहायला गेलो होतो. मात्र, स्मार्ट सिटी योजनेमध्ये नाशिकमध्ये जेवढं काम व्हायला पाहिजे होतं तितकं काम झालेलं नाही. नाशिक शहरातील महापालिकेच्या स्मार्ट बससेवेला विरोध होता आणि आहे. जगातील कुठलीही बससेवा फायद्यात नाही. मुंबईची बेस्ट सेवा त्याला अपवाद आहे. कारण, बेस्टला वीज पुरवठ्यातून होणारा फायदा बससेवेत घातला जात होता. मात्र, इतर कुठेही बससेवा फायद्यात नाही. नाशिक महापालिकेला हा खर्च परवडणार आहे का हे पाहावं लागेल, अशी भूमिका भुजबळ यांनी यावेळी मांडली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








