पाकिस्तानात अल्पवयीन मुलीचे अपहरण
वृत्तसंस्था/ जॅकबाबाद
पाकिस्तानच्या 15 वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीने स्थानिक न्यायालयात इस्लाम धर्म स्वीकारू इच्छित नसल्याचे स्पष्ट केले आहे. अली रझा मिर्ची या मुस्लीम इसमाशी विवाह लावून देण्यात आला होता, पण त्याच्यासोबत राहू इच्छित नाही. आईवडिलांकडे पाठविले जावे अशी विनंती महकने केली आहे. न्यायालयाच्या आत तसेच बाहेर मौलवींची मोठी संख्या पाहता न्यायाधीशांनी बंद कक्षात सुनावणी केली आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील जॅकबाबाद येथून 15 जानेवारी रोजी महकचे अपहरण करण्यात आले होते. महकचा विवाह बळजबरीने अली याच्याशी लावून देण्यात आला होता. या घटनेवरून सिंध प्रांतातील हिंदूंनी निदर्शने केली आहेत. उदारमतवादी मुस्लीम संघटनांनीही या निदर्शनांमध्ये भाग घेतला आहे.









