शहरातील दुसरे हॉस्पिटल : हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवेत मानाचा तुरा
इस्लामपूर / प्रतिनिधी
येथील डॉ.उमेश व डॉ.विधा चौगुले यांच्या चौगुले हॉस्पिटलने एनएबीएच नामांकनाची मोहोर उमटवली. या कसोटीस उतरणारे चौगुले हॉस्पिटल हे इस्लामपूर शहरातील दुसरे हॉस्पिटल आहे. नोव्हेंबर २०२१ पासून एनएबीएच चा दर्जा प्राप्त झाला आहे.
क्वॉलिटी कंट्रोल ऑफ इंडिया होप कंपनीच्या माध्यमातून एनएबीएच (नॅशनल अक्रिडेशन बोई फॉर हॉस्पिटल्स) साठी चौगुले हॉस्पिटलचे ऑडिट झाले. या ऑडिटमध्ये रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होण्यापासून उपचार घेवून बाहेर पडण्यापर्यंतच्या सेवासुविधांची तपासणी झाली. यामध्ये इमारत, फायर सेप्टी, यंत्रसामुग्री, लॅब, तंत्रज्ञ, कुशल डॉक्टर्स, नर्सेस याबाबींचा समावेश होता. हा दर्जा दोन वर्षासाठी राहणार आहे. या नामांकनामुळे रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्य आरोग्य विमा योजना यांचा लाभ घेता येणार आहे.
डॉ. उमेश चौगुले हे जनरल ॲण्ड लॅप्रोस्कोपीक सर्जन आहेत. तर डॉ.विद्या चौगुले या स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ आहेत. गेल्या २० वर्षाहून अधिक काळ चौगुले हॉस्पिटल अविरत रुग्ण सेवेत आहे. या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागासह सर्जरी, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, मुत्ररोग, कर्करोग शखक्रिया, मेंदू शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया , पोटविकार, मेडिसीन, भूलशास्त्र, सोनोग्राफी, एक्सरे, पॅथॉलॉजी, हे विभाग अद्ययावत आहेत. डॉ.बापूसो चौगुले चॅरिटेबल संस्थे मार्फत डॉ.चौगुले दांम्पत्य विविध सामाजिक व आरोग्य विषयक उपक्रम राबवतात. एनएबीएच नामांकनासाठी राजेश नायर, डॉ.विलास कापूरकर, डॉ.विजयकुमार बडेर, डॉ.मंगेश पेठकर, डॉ. केदार पाटील, इंजि.तुषार सगरे यांच्यासह हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.