प्रतिनिधी/इस्लामपूर
दीनदयाळ मागासवर्गीय सह.सूतगिरणीचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक, उरुण-इस्लामपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक ह.भ.प. चंद्रकांत महादेव पाटील (६२) यांचे निधन झाले. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. उपचारादरम्यान आज, शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
पाटील हे जेष्ठ नेते, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे समर्थक होते. इस्लामपूर व वाळवा तालुक्यात ते चंदूआबा म्हणून परिचित होते. शांत, संयमी व मितभाषी स्वभावामुळे आबा अजात शत्रू होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर टकलाईनगर (कापूसखेड नाका) स्मशानभूमीत कोरोनाचे नियम पाळून अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, मुलगा असा परिवार आहे.
Previous Articleविक्रमी! देशात 24 तासात 3.86 लाख नवे रुग्ण
Next Article कोरोना मदतकार्यासाठी मंत्री एक वर्षाचे वेतन देणार








