प्रतिनिधी/इस्लामपूर
मृत झालेल्या महिलेवर पुढे दोन दिवस उपचार सुरु ठेवून,बनावट कागदपत्रे बनवून जादा बिल आकरल्या प्रकरणी येथील आधार हॉस्पिटलचा डॉ.योगेश वाठारकर याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
डॉ.वाठारकर याच्याकडे सायरा हमीद शेख(६०)यांना मुलाने उपचारासाठी दाखल केले. दि.२४ फेब्रुवारी ते दि.१० मार्च या काळात वेगवेगळ्या तपासणी करुन जनरल व आयसीयू मध्ये उपचार केले. दि.१० रोजी त्यांचा मृत्यू दाखवून मृतदेह ताब्यात दिला.एक महिन्यांनी मुलगा सलीम हा नगरपालिकेत मृत्यूचा दाखल घेण्यास गेला.तेव्हा आईचा मृत्यू दि.८ रोजी झाल्याचे हॉस्पिटलमधून कळवलेवरुन नोंद झाली होती. त्याने याप्रकरणी पोलिसांना अर्ज देवून दाद मागितली. पोलिसांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटल मार्फत अहवाल मागवला.त्यामध्ये वाठारकर दोषी आढळून आल्याने सलीम याने फिर्याद दिली.डॉ.वाठारकर याच्या विरुध्द विश्वासघात, फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंद करुन अटक केली.








