प्रतिनिधी / इस्लामपूर
टोळीतील अंतर्गतवाद, वर्चस्ववाद या कारणावरून येथील निनाईनगर परिसरातील गुंड संतोष रखमाजी कदम(२४)याचा चाकूने हल्ला करून सहा जणांनी निघृण खून केला. ही घटना सोमवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. मृत व संशयीत रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तिघांच्याही तडपारीचा आदेश होवून स्थगिती मिळाली होती. तर एकावर ‘मोक्का’ची कारवाई तांत्रिक कारणामुळे अडखळली होती. पोलीसांनी तिघांना अटक केली आहे. तर अन्य तिघांचा शोध सुरु आहे.
अजित हणमंत पाटील२८, शिवाजीचौक उरुण, सुरज उर्फ पांडया अशोक जाधव २६,रा.उदयचौक, उरुण, प्रतिक उर्फ पिल्या सुरेश पाटील १९,अजिंक्यनगर इस्लामपूर या तिघांना पोलीसांनी अटक केली आहे. तर आणखी तीन संशयीतांचा या गुन्हयात समावेश असून त्यांचा शोध सुरु आहे. मृत कदम व आरोपी हे गुन्हेगारी कारवायात एकत्र कार्यरत होते. पण अलिकडे कदम व त्यांच्यात अंतर्गत धूसफूस व वर्चस्ववाद सुरु होता.
त्यातूनच सहा जणांनी कदमची गेम केल्याचा अंदाज पोलीसांचा आहे. रविवारी साडे आकरा वाजता कदम हा मोटारसायकलवरुन बहे रस्त्याने एम.आय.डी.सी.कडून इस्लामपूरकडे येत होता. दरम्यान अजित पाटील याने तु गँग सोबत नाहीस, असे म्हणून डॉ.संग्राम पाटील यांच्या दवाखान्याजवळ वाद घातला. यावेळी एक पोलीस कर्मचारी ड्युटी संपवून जात होता. त्याने वाद मिटवून पांगवा-पांगवी केली.
त्यानंतर कदम हा निनाईनगर मधील घराकडे निघून गेला. रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास पाटील हा अन्य पाच साथीदारांसमवेत मोटारसायकलवरुन निनाईनगर येथे आला. त्याने कदमच्या मोबाईवर फोन करून घराबाहेर बोलावून घेतले. कदम हा बाहेर आला असता, तयारीने गेलेल्या पाटील याच्यासह अन्य आरोपींनी त्याच्यावर हल्ला चढवला. पाटील याने चाकूने कदमच्या छाती, पोट, व मांडीवर वार केले. तर अन्य आरोपींनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. कदम याला त्याचा चुलत भाऊ शरद वसंत कदम व अन्य लोकांनी उपचारासाठी हलवले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








