प्रतिनिधी/इस्लामपूर
इस्लामपुरात कार चालकाच्या बेदरकारपणामुळे अनेक अपघात झाले. यामध्ये काही दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. तर विनायक अशोक पाटील हा तरुण गंभीर जखमी झाला. काल, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास इंडिका कार चालकाचा हा थरार घटला. या घटनेने एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी कारसह चालकास ताब्यात घेतले आहे. अमोल मंडले असे संशयित आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. गांधी चौक ते यल्लामा चौक दरम्यान हा थरारक अपघात झाला. यल्लामा चौकातील सहकार मेडिकल समोर विनायक पाटील या तरुणास या कारने धडक दिली. त्याच्यावर नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी अदित्य पाटील याने फिर्याद दिली आहे.
Previous Articleचोरीप्रकरणी नेपाळी तरुणाला अटक
Next Article खानापूरनजीक भीषण अपघातात महिला ठार, दोघे जखमी








