प्रतिनिधी / इस्लामपूर
वाळवा तालुक्यातील पेठ हद्दीतील जमिनीचा बनावट दस्त करुन श्रीकांत कृष्णा डांगे यांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींना न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तर तिघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
कर्ण वसंत येवले(४७,कोट भाग वाळवा) व अमीर वासुद्दीन हवालदार(२८,मणेर गल्ली, इस्लामपूर) अशी आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यात दहा आरोपींचा समावेश होता.येवले याला तीन तर हवालदार याला दोन वर्षे सक्तमजुरी देण्यात आली. चौथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.डी. जाधव यांनी ही शिक्षा सुनावली.डांगे यांची पेठ हद्दीत गट नं.६०६ मध्ये २ हे.४५ आर जमीन होती. येवले याने डांगे यांचे बोगस आधार कार्ड व पॅन कार्ड काढून प्रिती नंदराज चव्हाण व संजय रामचंद्र घाडगे यांना खरेदी दस्त करुन दिला.यामध्ये स्टॅम्पव्हेंडर म्हणून शिवप्रसाद कळसकर हे होते. याशिवाय साक्षीदार म्हणून मानाजी उर्फ मनोज शंकर पाटील हे होते.न्यायालयाने कळसकर,पाटील अन्य एकास निर्दोष मुक्त केले.
जमीन खरेदी देणारा येवले हा बोगस आहे,हे माहीत असूनही हवालदार याने हा व्यवहार जुळवून आणला.डांगे यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर न्यायाधीश जाधव यांच्यासमोर येवले, हवालदार, पाटील व कळसकर यांच्या विरुद्ध काम चालले.या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील के.ए. कोळी यांनी काम पाहिले. न्यायाधीश जाधव यांनी येवले यास दोषी धरुन तीन वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड व हवालदार यास दोन वर्षे सक्तमजुरी व १० हजार सातशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.दंडाच्या रकमेतील ४० हजार रुपये फिर्यादी डांगे यांना देण्याचे आदेश न्यायाधीश यांनी केले आहेत.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








