प्रतिनिधी / इस्लामपूर
मोबाईल इंस्टाग्राम ॲपद्वारे मैत्री करुन लग्नाचे अमिष दाखवत इस्लामपूर येथील जयदिप जयपाल चौधरी (१८) याने कोल्हापूर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. मुलगी गर्भवती राहिल्याने व प्रकृती बिघडल्याने हा प्रकार उघडकीस आला. या मुलीने उपचारादरम्यान चौधरी याच्या विरुध्द वर्दी दिली. हा गुन्हा इस्लामपूर पोलीसांकडे वर्ग केला आहे. संशयित चौधरी याला अटक करुन बुधवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पीडिता इयत्ता बारावी मध्ये शिकते. तिचे पाहुणे इस्लामपूर येथे आहेत. त्यांच्याकडे ती अधून-मधून येत असते. जानेवारी २०२१ मध्ये इंस्टाग्रामवर तीची चौधरीशी ओळख झाली. त्यांचे चॅटींग सुरु होते. एप्रिल २०२१ मध्ये ही मुलगी इस्लामपूरात आल्यानंतर चौधरी याने मोटारसायकलवरुन बहे येथे नदीकाठी नेवून बलात्कार केला. १५ दिवसांनी तो या मुलीस कोल्हापूरला सोडण्यासाठी गेला. दरम्यान त्याने वाठार येथील साई लॉजवर थांबून तिच्याशी शरीर संबध केले. दि.६ व ७ नोहेंबर रोजी या मुलीच्या पोटात दुखून त्रास होवू लागल्याने तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान पोलीसांकडे तिने वर्दी दिली.