इस्लामपूर / प्रतिनिधी
जलसंपदा मंत्री जयंत पाटील विविध माध्यमातून १५ कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे विकास आघाडीचे नगरसेवक नगरपालिकेची सभा पुढे ढकलण्याचे व सभा तहकूब करण्याचे षडयंत्र रचत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मिळून आलेला निधी शहराच्या विकासासाठी वापरणारच. भुयारी गटार विषयी आम्हाला विकास आघाडीने व्हिलन ठरवले. विकासाच्या आड नको म्हणून आम्ही त्यावेळेला संमती दर्शवली. त्यासाठीच्या भुसंपादनाकडे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. तसेच आघाडीतील सगळयांनी मुरुम विकून आप-आपले खिसे भरल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या संयुक्त पत्रकार बैठकीत केला. राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे म्हणाले, गेल्यावेळची सभेचे रेकॉर्ड होणे गरजेचे होते. कारण त्यामध्ये काही गोष्टी बदलल्या जातात. सभा घेण्याची व किंवातातडीने घेण्याचे अधिकार नगराध्यक्षांना असतात. शहराच्या विकासाचा मुद्दा असताना एक दिवसांची नोटीस कालावधी देवून सभा घेणे आवश्यक होते.
मात्र यांनी जाणून बुजून सात दिवसांचा नोटीस कालावधी ठेवून सभा लांबवली. हे सभागृह कायद्याला धरुन चालत नाही. आम्हीच आणलेला निधी मंजूर करण्यासाठी आम्हीच कशाला सभा पुढे ढकलू असा प्रश्न उपस्थित करत शहराच्या विकासाच्या दृष्टीने १५ कोटीची ६५ कामे मार्गी लागणार आहेत. हा निधी महाराष्ट्र सुवर्ण नगरोत्थान अभियान, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती
सुधारणातंर्गत हा आला आहे, विश्वनाथ डांगे हल्ला चढवताना म्हणाले, या निधीतून शहरातील प्रत्येक वार्डातील कामे पूर्ण होणार आहेत. मात्र काही तरी कारण सांगून विकास कामे रोखण्याचे काम विकास आघाडी करीत आहे. तसेच वेळ काढूपणा सुरु आहे.
शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. पावसाळा सुरु होण्याआधी ही कामे मार्गी लागणे गरजेचे आहे. मात्र प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हा विकास रोखायचं काम करण्यात येत आहे. बुधवार च्या ऑनलाईन सभेत विक्रम पाटील हे जाणून बुजून ऐकू येत नसल्याचे नाटक करत सभेची खिल्ली उडवत होते. प्रशासनातील सुलोचना माळी यांना स्वत:च्या चूका लपवण्यासाठी बळी देण्यात आले. सन २०१७ मध्ये भुयारी गटार योजनेसाठी आवश्यक जागा ताब्यात असल्याशिवाय निविदा प्रक्रिया राबवू नये, असे परिपत्रक आहे. एसटीपीच्या जागा ताब्यात मिळतील तेंव्हा हा ठराव पुढे आणणे, आवश्यक होते. मात्र त्याचे राजकारण करत आहेत. विकास आघाडीने १२ कोटींपेक्षा जास्त निधी आणलेला नाही, पण ते सव्वाशे कोटी रुपयांचा निधी आणल्याचा डांगोरा पिटत
आहेत.
विकास आघाडीतील काही नगरसेवक रात्र पाळीत विकास कामांचा शुभारंभ करीत असल्याचा आरोप आमच्यावर करीत आहेत. पण आम्ही कोरोना नियमांचे पालन करुन ८ वाजण्यापूर्वी विकास कामांचा शुभारंभ केला आहे. शहाजी पाटील म्हणाले, बुधवारची सभा म्हणजे, काळा दिवस आहे. विकास आघाडी ही शहराच्या विकासाच्या आड येत आहे. जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. यावेळी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव, सुनिता सपकाळ, संगिता कांबळे उपस्थित होत्या.







