ऑनलाईन टीम / श्रीहरिकोटा :
शत्रू राष्ट्रांवर नजर ठेवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाईट (एओएस-01) चे प्रक्षेपण करणार आहे. आज दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी पीएसएलव्ही-सी 49 रॉकेटच्या माध्यमातून या उपग्रहाचे प्रक्षेपण होईल.
कोरोनाच्या संक्रमणामुळे यंदाच्या वर्षातील इस्त्रोचे हे पहिले प्रक्षेपण आहे. अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाईट सिंथेटिक ऍपर्चर रडारच्या माध्यमातून दिवसा तसेच रात्रीच्या वेळीही शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येणार आहे. विशेषतः लष्कराला लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर या उपग्रहाचा फायदा होणार आहे.
अर्थ ऑब्जर्वेशन उपग्रहाबरोबर इस्त्रोच्या न्यूस्पेस इंडिया लिमिटेड सोबतच्या व्यापारी करारांतर्गत इतर व्यापारी उपग्रहांचेही प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या उपग्रहांच्या प्रक्षेपणाचे थेट प्रक्षेपण इस्त्रोच्या वेबसाईट, युट्यूब, फेसबुक आणि ट्विटर चॅनेलवरून करण्यात येणार आहे.









