इस्रायल या देशात कोरोना विषाणूवरील लसीची पहिली खेप बुधवारी पोहोचली आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत देशाच्या सुमारे एक तृतीयांश लोकसंख्येसाठी हे डोस पुरेसे असल्याचे देशातील वितरकाने म्हटले आहे. लसीच्या खेपसह कार्गो विमान बेन गुरियोन विमानतळावर उतरले आहे. फायजर लसीचे हजारो डोस चाचण्यांसाठी दाखल झाल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे. फायजरकडून मागील महिन्यात इस्रायलला लसीचे 8 दशलक्ष डोस प्रदान करण्यावर सहमती दर्शविण्यात आली होती. चालू आठवडय़ात इस्रायलमध्ये वृद्ध आणि अन्य उच्च जोखीमयुक्त लोकसंख्येला ही लस देण्यात येणार असल्याची माहिती इस्रायलचे गुप्तचर मंत्री एली कोहेन यांनी दिली आहे. 9 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या इस्रायलमध्ये 3 लाखांहून अधिक बाधित सापडले असून 2,925 जणांचा मृत्यू झाला आहे.
Previous Articleखरेदी डिझायनर कपडय़ांची
Next Article 8 सेकंदांसाठी विलगीकरणाचा भंग, मोठा दंड
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.