सीरियाच्या विमानतळावर डागली क्षेपणास्त्रs – 6 सैनिक जखमी
वृत्तसंस्था/ जेरूसलेम
इस्रायलने पुन्हा एकदा सीरियावर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यांमध्ये 2 विदेशी दहशतवादी मारले गेले आहेत. तर सीरियाचे 6 सैनिक जखमी झाल्याचे समजते. ब्रिटनच्या वॉर मॉनिटरनुसार इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कस येथील विमानतळावर क्षेपणास्त्रs डागली आहेत. पण मृतांबद्दल कुठलीच माहिती मिळू शकलेली नाही.
इस्रायलकडून टी-4 सैन्य वायुतळावर क्षेपणास्त्रs डागण्यात आली. इस्रायलने एका ड्रोन डेपोला लक्ष्य केले आहे. इस्रायलच्या संरक्षण अधिकाऱयाने हवाई हल्ल्याची बाब मान्य केली आहे. इस्रायलने सीरियात इराणशी संबंधित सैन्य ठिकाणांवर शेकडोवेळा कारवाई केली आहे. स्वतःच्या उत्तर सीमेवर इराणी घुसखोरीची भीती इस्रायलला सतावत आहे. याचमुळे इस्रायलकडून इराणचे तळ आणि लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ले केले जातात. हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेला इराण आणि सीरियाकडून सर्वप्रकारची मदत मिळते.









