314 विद्यार्थी पोहोचले मायदेशी
तेल अवीव
कोरोनामुळे हवाई सेवा बंद असल्याने भारतात अडकलेल्या इस्त्रायलच्या 314 विद्यार्थ्यांना एअर इंडियाने बुधवारी मायदेशी रवाना केले. या विशेष कामगिरीबद्दल इस्त्रायलने एअर इंडियाचे आभार मानले आहेत. तसेच विमानतळावर उतरताना इस्त्रायलच्या नागरिकांनी हातात भारताचे झेंडे घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.
भारतात असणाऱया विद्यार्थ्यांना मायदेशात पाठविण्याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडे इस्त्रायलने विनंती केली. त्यानुसार बुधवारी सायंकाळी एअर इंडियाच्या विशेष विमानाने त्यांची रवानगी करण्यात आली. यावेळी नवी दिल्लीतील विमानतळावर इस्त्रायलचे भारतातील राजदूत रोन मल्का यांनी हजेरी लावली. मी भारतासह एअर इंडियाच्या कर्मचाऱयांवचे आभार मानतो. त्यांच्या प्रयत्नामुळे इस्त्रायलचे विद्यार्थी सुखरूप घरी पोहोचले, अशा शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली.