वृत्तसंस्था/ कोलकाता
इंग्लंडचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबालपटू तसेच लिव्हरपूल संघातील अनुभवी सदस्य रॉबी फाऊलर यांची इस्ट बंगाल फुटबॉल संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्याची घोषणा या संघाचे मालक हरी मोहन बांगुर यांनी दिली आहे.
इस्ट बंगाल संघाच्या मालकानी गुरूवारी रात्री रॉबी फाऊलर यांच्याबरोबर लेखी करार केला आहे. गोव्यातील एका फुटबॉल क्लबमध्ये फाऊलर आठवडाभराच्या कालावधीत दाखल होणार होते, याची माहिती मिळताच इस्ट बंगालने तातडीने फाऊलर यांच्याबरोबर करार केला आहे. इस्ट बंगालकडून फाऊलर यांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी ऑफर देण्यात आल्याचे बांगुर यांनी सांगितले. इस्ट बंगाल संघाचा माजी कर्णधार रेनेडी सिंग याच्यावर साहाय्यक प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत इस्ट बंगाल तसेच एटीके-बगान हे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात.









