वृत्तसंस्था /कोलकाता :
सध्या सुरू असलेल्या आय लीग फुटबॉल स्पर्धेच्या हंगामाअखेरपर्यंत इस्ट बंगाल क्लबने मारिओ रिव्हेरा यांची प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. आता रिव्हेरा यांना ट्रूल्स यांचे प्रशिक्षणावेळी साहाय्यक प्रशिक्षक म्हणून साथ मिळणार आहे.
इस्ट बंगालच्या वरिष्ठ संघाला 31 मे 2020 पर्यंत रिव्हेरा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे, अशी माहिती या क्लबच्या वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. दोन दिवसांपूर्वी इस्ट बंगालचे प्रशिक्षक मेंडीझ यांनी आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. आय लीग फुटबॉल स्पर्धेतील इस्ट बंगालची कामगिरी निराशजनक झाली असून ते या स्पर्धेच्या गुणतक्त्यात सातव्या स्थानावर आहेत. या स्पर्धेत इस्ट बंगाल संघाला सलग तीन सामन्यात हार पत्करावी लागली आहे.