वृत्तसंस्था/ कोलकाता
इस्ट बंगाल फुटबॉल संघाचे प्रमुख प्रशिक्षक ऍलेजेड्रो मेंडीझ यांनी मंगळवारी आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. आय लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात मोहन बागानकडून इस्ट बंगालला पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर दोन दिवसातच प्रशिक्षक मेंडीझ यांनी काही आपल्या वैयक्तिक समस्यामुळे राजीनामा देत असल्याचे सांगितले.
स्पेनचे मेंडीझ यांच्यावर इस्ट बंगाल संघाच्या सलग तीन पराभवानंतर जोरदार टीका करण्यात आली. आय लीग स्पर्धेत गुणतक्त्यात इस्ट बंगालचा संघ सात सामन्यांतून आठ गुण मिळविले आहेत तर मोहन बागानने आठ सामन्यांतून 17 गुण घेतले आहेत.