न्यूयॉर्क
इस्लामिक स्टेट अतिरेकी संघटनेचा नेता अबु इब्राहिम अल हाश्मी अल कुरेशी याचा खात्मा झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेने याबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या संघटनेच्या नव्या नेतेपदी अबु अल हासन अल हाशमी अल कुरेशी याची निवड झाली असल्याचे सांगण्यात येते. या संदर्भातली स्पष्टता नुकतीच करण्यात आली आहे. नवा नेता अबु अल हासन अल हाशमी अल कुरेशी हे इराकचे माजी नेते सद्दाम हुसेन यांच्या सैन्यामध्ये सैनिक होते. गेल्या दोन वर्षापासून या संघटनेत ते सक्रीय आहेत, असे सांगितले जाते. फेब्रुवारीत अमेरिकेच्या खास दलाने सीरियामध्ये अबु इब्राहिम अल हाश्मी अल कुरेशी याच्यावर धाड टाकली होती. त्यावेळी बॉम्ब स्फोट घडवून स्वतः आणि कुटुंबीय सदस्यांनाही मारलं होतं. मृत्युसमयी कुरेशीचे वय 45 वर्षे होते. दोन वर्षापूर्वी 2019 मध्येही अशाच पद्धतीने इसिस नेता अबु बक्र अल बागदादीचाही मृत्यु झाला होता.









