वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे झालेल्या ब्रिस्बेन खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत कझाकस्तानच्या इलेना रिबाकिनाने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना साबालेंकाचा पराभव केला.
2023 साली मेलबोर्न पार्कच्या टेनिस कोर्टवर झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील अंतिम सामना रिबाकिना आणि साबालेंका याच्यात झाला होता. रविवारच्या अंतिम सामन्यात रिबाकिनाने साबालेंकाचा 6-0, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेतील आपले सहावे विजेतेपद मिळविले.









