वृत्तसंस्था/ बेंगळूर
गेल्या 3 वर्षाच्या काळामध्ये इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. इलेक्ट्रीक वाहनांप्रती ग्राहकांचा वाढता कल यातून दिसतो आहे.
ई-वाहन पोर्टलच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2020 मध्ये 1 लाख 67 हजार 41 इलेक्ट्रीक वाहनांची नोंदणी (रेजिस्ट्रेशन) करण्यात आली आहे. 2018 आर्थिक वर्षामध्ये 69 हजार 12 इलेक्ट्रीक वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. गेल्या 3 वर्षाच्या काळामध्ये 3 लाख 79 हजार इलेक्ट्रीक वाहनांची विक्री देशामध्ये झाली आहे.
इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीला भारत सरकारचे प्रोत्साहन कामी आले आहे. इलेक्ट्रीक वाहनावरचा जीएसटी कर 12 टक्के वरून 5 टक्के करण्यात आल्याने इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे वाहनांच्या चार्जिंगकरता आवश्यक असणाऱया चार्जिंग स्टेशन्सना लावण्यात येणारा जीएसटी कर 18 टक्क्मयांवरून 5 टक्के इतका करण्यात आला आहे, ज्यामुळे येणाऱया काळामध्ये इलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनच्या उभारणीमध्ये वाढ होताना दिसणार आहे.
सरकारच्या प्रोत्साहनात्मक धोरणामुळे इलेक्ट्रीक वाहन उद्योगामध्ये येणाऱया काळामध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने 2019-20 अर्थसंकल्पामध्ये इलेक्ट्रीक वाहनांवर कर्जामार्फत केलेल्या खरेदीवर प्राप्तीकराच्या व्याजावर दीड लाखापर्यंत सूटही देऊ केली आहे. याने वाहन खरेदीत वाढ होण्याचा अंदाज सांगितला जात आहे.









