बीजिंग
दक्षिण इराणमध्ये शनिवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता 6.0 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपात 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 44 जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे, शुक्रवारी रात्री उशिरा चीनच्या शिनजियांगमध्ये 4.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. मात्र चीनमध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. गेल्या आठवडय़ात अफगाणिस्तानला शक्तिशाली भूकंपाचा तडाखा बसल्यामुळे सध्या भूकंपाबाबत लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.









