ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे इराणमध्ये अडकलेल्या 234 भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विटरच्या माध्यामातून याबाबतची माहिती दिली आहे.
इराणमधून भारतात आलेल्या 234 नागरिकांपैकी 131 विद्यार्थी आहेत. तर 103 तीर्थयात्री आहेत. या प्रवाशांना घेऊन इराणमधून विमान दिल्ली येथे दाखल झाले. त्यानंतर ते पुन्हा जस्सलमेरसाठी रवाणा झाले. या सर्व नागरिकांची लष्कराच्या विलगीकरण विभागात स्क्रिनिंग करण्यात येणार असून त्यांना जस्सलमेरच्या क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्यात येणार आहे.
कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात दिवसेंदिवस वाढतच आहे. इराणमध्येही आतापर्यंत 700 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर 13 हजार जणांना या विषाणूची लागण झाली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे 234 भारतीय नागरिक इराणमध्ये अडकून पडले होते. त्यांना मायदेशी परतण्याची चिंता लागून राहिली होती. अखेर केंद्र सरकारने त्यांना सुखरुप मायदेशी परत आणले.









