इराणवर संशयाची सुई
तेहरान / वृत्तसंस्था
इराकमधील अमेरिकेच्या दुतावासाजवळ रॉकेटद्वारे हल्ले झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे. इराणमधील यंत्रणांकडून हा हल्ला झाल्याचा संशय असल्याने पुन्हा एकदा इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. रविवारी रात्री इराकमध्ये हल्ले करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. या हल्ल्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नसले तरी अद्याप कोणीही जबाबदारी न स्वीकारल्यामुळे हल्ल्याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.
मागील पंधरवडय़ापूर्वीच बगदादमधील अमेरिकी दुतावासाजवळ दोन रॉकेटद्वारे हल्ला करण्यात आला होता. या ठिकाणी सरकारी इमारती आणि विविध देशांचे राजकीय दुतावास आहेत. इराणच्या सैन्याचे मुख्य कमांडर कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने ड्रोन हल्ल्यांद्वारे ठार केले होते. त्यानंतर इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या तणावातूनच इराकमधील अमेरिकन दुतावासावर हल्ला केल्याचे बोलले जात आहे.









