नवी दिल्ली
भारतातील दिग्गज एफएमसीजी कंपनी इमामीने नुकतेच ब्रिटनमधील बहुराष्ट्रीय कंपनी रेकिटचे पूर्णतः अधिग्रहण केले आहे. सदरच्या अधिग्रहणाच्या व्यवहारासाठी इमामीने 432 कोटी रुपये मोजले आहेत. दरम्यान सोमवारी शेअर बाजारात इमामीच्या समभागाने 52 आठवडय़ानंतर नीचांकी स्तर गाठला होता.
कंपनीचा समभाग सोमवारी बीएसईवर 2 टक्के घसरणीसह 442 रुपयांवर होता. कंपनीने डर्मिकूलचे अधिग्रहण केले असल्याचा हा परिणाम आहे.
इमामी ही थंडावा देणाऱया पावडरचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेते. प्रिकली हीट टाल्क पॉवडर या क्षेत्रामध्ये डर्मिकूल नावाने इमामीची पावडर मोठय़ा प्रमाणात बाजारात विक्री होते. याचप्रमाणे यांचे नवरत्न कुल टाल्क हेही उत्पादन आहे.
20 टक्के वाटा
पावडरच्या क्षेत्रामध्ये कंपनीचा वाटा 20 टक्के आहे. येणाऱया काळामध्ये या अधिग्रहणानंतर इमामीला आपल्या व्यवसायाला विस्ताराची जोड अधिक सक्षमपणे देता येणार आहे.









